आज दिनांक चार सप्टेंबर 2023 रोजी रास्ता पेठ ,पुणे झोन कार्यालय या ठिकाणी क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या विचाराने क्रांती चे धेय घेऊन चालणारी संघटना क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती त्यात आपले लाईन स्टाफ बांधव जे कामावर असताना शहीद झाले त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
१. तसेच लाईन स्टाफ वर होणाऱ्या अन्यायकारक कारवाई व वागणूक
३ धेय्य महावितरण लाईनस्टाफ वीज अपघात शून्य.
या प्रमुख मुद्यावर मार्ग निघावा या करिता मोठ्या संख्येने लाईनस्टाफ एकत्रित झाला होता व यावेळी सर्व लाईनस्टाफ यांना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली.
क्रांतिकारी लाईनस्टाफ सेनेचे केंद्रीय, परिमंडळ, मंडळ विभागीय स्तरावरील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
तसेच संघटना भेदभाव विसरून या सभेला कंत्राटी कामगार महासंघ महामंत्री राहुल बोडके ,झोन सचिव निखिल टेकवडे यांनी देखील पाठिंबा दिला व पुणे झोन मधील सर्व लाईनस्टाफ आपापले संघटना विसरून लाईनस्टाफ च्या लढ्या साठी एकत्र आले होते
अरे आवाज दो हम एक है🚩
एकच यज्ञ जय तंत्रज्ञ.
क्रांतीकारी लाईनस्टाफ सेनेचा विजय असो.
आपलेच सहकारी-
संतोष राऊत सचिव
शिवराज लांब सहसचिव
संभाजी सोलाट कार्याध्यक्ष
केदारी महाराज रास्ता पेठ सर्कल मार्गदर्शक
क्रांतिकारी लाईनस्टाफ सेना महाराष्ट्र राज्य

0 Comments